पुणे, 7 जून : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ इर्टिका या चारचाकी मोटार वाहनाचा पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक टायर फुटल्याने अपघात झाला आहे. या गाडीने डिव्हायडर तोडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिला. या अपघातात बोलेरो गाडीमधील तिघे जणं व इर्टिकामधील एक जण जागीच ठार झाले.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावर इंदापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर व्यवहारे पेट्रोल पंपानजीक बोलेरो आणि इर्टिकाला भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. साधारण दुपारी हा भीषण अपघात झाला आहे.
हे ही वाचा-पुणे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद
(एम. एच. १३ ए. झेड. ३९०१) ही महिंद्रा बोलेरो पुण्याकडून सोलापूरकडे रवाना झाली होती. यात तीन प्रवासी होते. तर ही इर्टीका (एम. एच. ४६ बी.ई. ४५१५) सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात निघाली होती.
यात एक प्रवासी होता. इंदापूर जवळील व्यवहारे पेट्रोलियम जवळ इरटीगा वाहन हे डिवायडर तोडून बोलेरो गाडीला धडकली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. बोलेरो कारमधील अविनाश कुंडलिक पवार वय वर्षे 32, गणेश पोपत गोडसे वय 34 ,बाळासो चांगदेव साळुंखे ही सर्वजणं गुरसाळे तालुका पंढरपूर येथील राहणारे असून इर्टीकाकार मधील चालक ज्योतीराम सूर्यभान पवार उलवे जिल्हा रायगड येथे राहत होते. या चौघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.