पुण्यातून मोठी दिलासादायक बातमी, 4799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी

पुण्यातून मोठी दिलासादायक बातमी, 4799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी

कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असताना पुण्यातून दिलासादायक बातमी आली आहे.

  • Share this:

पुणे, 30 मे: कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असताना पुण्यातून दिलासादायक बातमी आली आहे. पुणे विभागातील 4799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9364 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 4140 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 209 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

हेही वाचा.. कोरोनाच्या काळात बहुतांश महिला 'या' त्रासाला कंटाळल्या, धक्कादायक माहिती आली समोर

पुणे जिल्ह्यातील 7441 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2913 आहे. कोरोनाबाधित एकूण 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3 कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 482 कोरोना बाधीत रुग्ण असून 144 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 836 कोरोनाबाधित रुग्ण असून 321 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 436 आहे. कोरोनाबाधित एकूण 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 101 रुग्ण असून 55 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 43 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 504 कोरोनाबाधित रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 427 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा..दिलासा! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा

आजपर्यत विभागामध्ये एकुण 85723 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 80520 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5203 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 71041 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 9364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

First published: May 30, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading