मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune : आजोबांनी कमाल केली, 78 व्या वर्षी वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकली! पाहा Video

Pune : आजोबांनी कमाल केली, 78 व्या वर्षी वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकली! पाहा Video

X
Pune

Pune : पुण्याच्या श्रीकांत आडकर या आजोबांनी 78 व्या वर्षी कमाल करत वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकली आहे.

Pune : पुण्याच्या श्रीकांत आडकर या आजोबांनी 78 व्या वर्षी कमाल करत वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकली आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Pune, India

  पुणे, 5 जानेवारी :  वय झालं की हाडं ठिसूळ होतात आणि हलचाली मंदावतात. त्यामुळे अनेकदा वयस्कर व्यक्तींनी आधाराची गरज भासते. पुण्याच्या श्रीकांत आडकर या आजोबांनी वाढत्या वयातही फिटनेसचं उदाहरण घालून दिलंय. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत यश मिळवलंय. या वयातही त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा असून त्यापासून सर्वांनी आदर्श घेण्याची गरज आहे.

  कसा केला विक्रम?

  श्रीकांत यांनी या विक्रमाचे रहस्य यावेळी सांगितले. 'मी नियमित बॉडी बिल्डिंगचा व्यायाम करत असतो. माझं शरीर आजही घोटीव आहे. कर्वेनगरमधल्या सोमण क्लबचे राजहंस मेहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी वेटलिफ्टिंगचा सराव करत होतो. त्यांनी डेडलिफ्ट या प्रकारात माझ्याकडून तयारी करून घेतली.

  या वयामध्ये डेडलिफ्टिंग सारखा अवघड प्रकार करणे हे मोठं आव्हान होतं. वाढत्या वयाचा परिणाम मणक्यावर झालेला असतो. त्यातून हाडांची झीज झालेली असते. मेहंदळे यांनी माझ्याकडून योग्य प्रकारचा सराव करून घेतला. त्यामुळे मी या स्पर्धेत तब्बल 50 किलो वजन डेडलिफ्ट प्रकारत उचललं, ' अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.

  औरंगाबादच्या कुटुंबाची कमाल, एकाच स्पर्धेत आई-वडिलांसह मुलानं जिंकलं मेडल Video

  निरोगी शरिराचं रहस्य काय?

  श्रीकांत यांनी हा पराक्रम करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. श्रीकांत यांनी तरुणपणी पुणेश्री सारख्या अनेक बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.  त्यांचा फिटनेस तरुणांनीही प्रेरणा घ्यावा असा आहे. या निरोगी शरिराचं रहस्य त्यांनी यावेळी सांगितलं.

  'मला कोणतेही व्यसन नाही. मी नेहमी आरोग्याकडं व्यवस्थित लक्ष दिलं. खाण्यापिण्याची आणि झोपण्याच्या वेळा पाळल्या. माझे वडील पोलीस अधिकारी होते. त्यांच्यामुळे घरामध्ये सर्वांनाच व्यायामाची आवड निर्माण झाली. नियमित व्यायामाचाही मला फायदा झाला. आरोग्याची नियमित काळजी घेतली तर  तुम्ही 80 व्या वर्षीही फिट राहू शकता' असं त्यांनी स्पष्ट केलं.

  First published:

  Tags: Local18, Pune, Sports