• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • काका खाऊला पैसे देतायेत समजून 7 वर्षांची चिमुरडी गेली पुढे, झाली भयंकर अवस्था

काका खाऊला पैसे देतायेत समजून 7 वर्षांची चिमुरडी गेली पुढे, झाली भयंकर अवस्था

देशाच्या राजधानीत (New Delhi) माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्‍ली, 25 ऑक्टोबर : देशाच्या राजधानीत (New Delhi) माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. दिल्‍लीतील रंजीत नगर भागात एका नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीला 10 रुपयांचा आमिष दाखवून स्वत:जवळ बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार (Rape) केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. प्रकरणाचं (Crime News) गांभीर्य लक्षात घेत दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस जारी केलं आहे. आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाला 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रंजीत नगर भागात एका मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली होती. ज्यानुसार 7 वर्षांत्या एका चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. या नराधमाने मुलीला 10 रुपयांचं आमिष दिलं होतं. यानंतर त्यांने चिमुरडीवर बलात्कार केला, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडितेचे वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं. तिला खूप जास्त रक्तस्त्राव झाला असल्याने तातडीने तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं. हे ही वाचा-अनैतिक संबंधात पतीचा होता अडथळा, 1 लाखाची सुपारी देऊन पत्नीने केला गेम या प्रकरणात आयोगाच्या टीमने मुलीवर झालेल्या अत्याचारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात FIR दाखल करण्याची मागणी केली जात आहे, सोबतच आरोपीला अटक केली जावी असंही आयोगाचं म्हणणं आहे. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी सांगितलं की, मी या घटनेमुळे खूप दुखी आहे. ही अत्यंत चिंतेची आणि लज्जास्पद बाब आहे. एका 10 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. वारंवार अशा घटना वाढत आहेत. केवळ कडक कारवाई करूनच लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांवर नियंत्रण आणलं जाऊ शकतं. असंही स्वाती मालीवाल म्हणाल्या.
  Published by:Meenal Gangurde
  First published: