मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 17 मार्च : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि कारच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार येत होती. त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीनं वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.

उभ्या असलेल्या ट्रकला धडक   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू ट्रकचा टायर फुटल्यानं एक ट्रक मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर उभा होता. हा ट्रक रस्त्यावर उभा असताना मुंबईवरून पुण्याला अतिवेगात जाणारी टाटाची कार थेट ट्रकच्या मागे घुसली यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. राहुल बाळकृष्ण कुलकर्णी, हेमंत राऊत आणि विजय विश्वनाथ खैर असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिंची नावं आहेत.

समुद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा; बंदूक अन् तलवारीच्या धाकावर सोने, रोख रकमेसह वाहनही पळवले  

अपघाताचं कारण अपष्ट 

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर हा भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. या अपघातामध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला. नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

First published: