जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / समुद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा; बंदूक अन् तलवारीच्या धाकावर सोने, रोख रकमेसह वाहनही पळवले

समुद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा; बंदूक अन् तलवारीच्या धाकावर सोने, रोख रकमेसह वाहनही पळवले

समृद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा

समृद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा

समृद्धी महामार्गावर बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून टोळक्यानं एका वहान चालकाला लुटलं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च : समृद्धी महामार्ग सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या महामार्गावर अनेक भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता हा महामार्ग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो म्हणजे या महामार्गावर बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून टोळक्यानं एका वहान चालकाला लुटलं आहे. तब्बल 85 हजारांचा ऐवज घेऊन हे टोळकं फरार झालं. ही घटना 14 मार्च रोजी रात्री सांगवी परिसरातील बोगद्याजवळ घडली आहे. या घटनेत वाहन चालकाच्या दोन अंगठ्या आणि रोख 65 हजार रुपये असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे चोरट्यांनी या वाहनचालकाचे हायवा वाहनही पळवले आहे. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गुन्हा दाखल पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रशांत जानकर ठोकळ असं या वाहन चालकाचं नाव आहे. ते नवी मुंबईतील पनवेल परिसरातील सुयश पार्क येथे राहातात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जणांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात लूट प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोखंडी रॉडने मारहाण घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत ठोकळ हे समृद्धी महामार्गावरून जात असताना टोळक्याकडून त्यांचे वाहन आडवण्यात आले. त्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यांना बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून दोन अंगठ्या आणि रोख 65 हजार रुपये असा एकूण 85 हजारांचा ऐवज घेऊन टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर ठोकळ यांनी फुलंब्री पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. ठोकळ यांच्या तक्रारीवरून 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात