पुणे, 23 मार्च : आज 23 मार्च अर्थात शहीद दिन (23 march shaheed diwas). देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर जाणारे क्रांतिकारक भगतसिंग ( bhagat singh), राजगुरू (rajguru) आणि सुखदेव (sukhdev) यांचा बलिदान दिन (balidan diwas). त्यातले राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरचे. 23 मार्चला बलिदान तर 24 ऑगस्टला जन्मदिवस. हे दोन्ही दिवस पुणे जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी राजगुरुनगर येथे राजगुरुवाड्यावर साजरे केले जातात. मात्र क्रांतीकारकाचा जन्मवाडा व स्मारक आजही दुर्लक्षीतच असून या हुतात्माच्या पदरी स्वातंत्र्यानंतरही अवहेलनाच दिसतेय.
भीमा नदीच्या तिरावर दिसणारा क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचा वाडा पुणे-नाशिक महामार्गवरून प्रवास करताना लक्ष वेधतो. याच वाड्यात हुतात्मा राजगुरु यांचं बालपण गेलं, देशासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्याच्या याच वाड्याला मोठा इतिहास असून इथं येणाऱ्या प्रत्येकाला या वाड्यातून क्रांतीकारक प्रेरणा मिळते. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यानंतरही क्रांतीकारकाच्या जन्मस्थळ असलेल्या वाड्याच्या स्मारकाच्या उभारणीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
हुतात्मा राजगुरुंचे स्मारक कधी होणार?
स्मारकासाठी निधीची तरतूद होते पण काम मात्र नाही. रहिवासी जागा द्यायला तयार सरकार कधी घेणार दखल, असे सवाल उपस्थितीत झाले आहे. या वाड्याचे काम 3 वर्षांपूर्वी 95 लाख रुपये खर्च करुन सागवाणी लाकडात झा.ले काही प्रमाणात काम चांगले झालेही मात्र या सागवाणी लाकडाला पडलेल्या भेगा, फुगलेला भाग यावरून या कामाचा दर्जा, या वाड्याच्या कामात अनेक वेळा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका
त्यानंतर संपूर्ण स्मारक तयार करण्याचा आराखडा तयार झाला. त्यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आजूबाजूला नागरिकांनी आपली जागा स्मारकासाठी देण्याची तयारी दाखवली पण सरकार पातळीवरील असलेली उदासीनता अजूनही स्मारकाचे काम पूर्ण करू शकली नाही.
पंजाब राज्यात हुतात्मा भगतसिंग,सुखदेव यांची जयंती व बलिदान दिवस शासकीय स्तरावर केला जातो. त्याच धर्तीवर राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळावर साजरा व्हावा, हीच माफक अपेक्षा राजगुरुनगरकर व्यक्त करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.