मराठी बातम्या /बातम्या /मनी /

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका

पॅन कार्ड (Pan Card) आधारशी (Aadhar) लिंक करण्यासह अनेक महत्त्वाची आर्थिक कामं करण्यासाठी अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मुदत संपण्याआधी ‘ही’ पाच महत्त्वाची कामं तातडीनं पूर्ण करा; अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

पॅन कार्ड (Pan Card) आधारशी (Aadhar) लिंक करण्यासह अनेक महत्त्वाची आर्थिक कामं करण्यासाठी अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मुदत संपण्याआधी ‘ही’ पाच महत्त्वाची कामं तातडीनं पूर्ण करा; अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

पॅन कार्ड (Pan Card) आधारशी (Aadhar) लिंक करण्यासह अनेक महत्त्वाची आर्थिक कामं करण्यासाठी अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मुदत संपण्याआधी ‘ही’ पाच महत्त्वाची कामं तातडीनं पूर्ण करा; अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

नवी दिल्ली, 23 मार्च : आर्थिक वर्ष 2020-21 (Financial Year 2020-21) आता संपत आलं आहे. त्यामुळे या वर्षातील आर्थिक कामांसाठीची अंतिम मुदत 31 मार्च आता अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. पॅन कार्ड (Pan Card) आधारशी (Aadhar) लिंक करण्यासह अनेक महत्त्वाची आर्थिक कामं करण्यासाठी अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे मुदत संपण्याआधी ‘ही’ पाच महत्त्वाची कामं तातडीनं पूर्ण करा; अन्यथा मोठा फटका बसू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख - अद्याप तुम्ही आर्थिक वर्ष 2019-2020 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return- ITR) भरला नसेल, तर दंड आणि व्याजासह तो भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. 31 मार्चपर्यंत रिटर्न फाईल केला नाही, तर तो नंतर फाईल करता येणार नाही आणि त्यासाठी दंडही भरावा लागेल. इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीशीचं उत्तरही द्यावं लागेल. रिवाईज्ड आणि डिलेड इन्कमटॅक्स रिटर्न (Revised and Delayed Income tax Return) - तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल केला आहे आणि त्यात काही चूक राहिली असेल, तर रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न (Revised Income tax Return) भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कोणतीही सुधारणा करता येणार नाही. त्याचबरोबर उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड ही होऊ शकतो. तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंतच असेल तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. डिडक्शन क्लेम (Deduction Claim) - 2020-21 साठी इन्कम टॅक्स डिडक्शन क्लेम करण्यासाठी आयुर्विमा प्रीमियम (Life insurance), पीपीएफमधील (PPF) गुंतवणूक, मेडिक्लेम प्रीमियम (Mediclaim) साठी पेमेंट करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. 31 मार्चपूर्वी ही पेमेंटस केली नाहीत, तर संपूर्ण उत्पन्नावर कर भरावा लागेल. अ‍ॅडव्हान्स करभरणा (Advance Tax ) - प्राप्तिकर कायद्यानुसार (Income tax Act), एखाद्या व्यक्तीची कर देयता वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि ते ज्येष्ठ नागरिक नसतील तर त्यांना चार हप्त्यांमध्ये म्हणजेच 15 जुलै, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च पूर्वीचा आगाऊ कर (Advance Tax) भरावा लागेल. शेवटच्या हप्त्याची मुदत 15 मार्च असते. तोपर्यंत असा टॅक्स भरलेला नसेल किंवा 90 टक्क्यांपेक्षा कमी कर भरलेला असेल, तर 31 मार्चपर्यंत आगाऊ कर भरता येतो. अन्यथा एक एप्रिल 2021 पासून प्राप्तिकर कायद्याच्या (Income tax Act) कलम 234 बी अंतर्गत व्याज भरावं लागतं. पॅन कार्ड - आधार लिंक करणं -  आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 ही अंतिम मुदत आहे. नियमांनुसार हे अनिवार्य आहे. या तारखेपर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर 1 एप्रिल 2021 पासून पॅनकार्ड निष्क्रीय होऊ शकतं. पॅनकार्ड निष्क्रीय झाल्यास तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. www.incometaxindiaefiling.gov.in या लिंकवर जाऊन तुम्ही पॅनकार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करू शकता.
First published:

Tags: Aadhar card, Income tax, Insurance, March 2021, Money, Pan card, PPF

पुढील बातम्या