मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus: जूनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून मिळणार मोठा दिलासा? लसीकरणाचा वेगही वाढणार

Coronavirus: जूनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून मिळणार मोठा दिलासा? लसीकरणाचा वेगही वाढणार

जून महिन्यात देशाला 12 कोटीहून अधिक लशी उपलब्ध होऊन लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

जून महिन्यात देशाला 12 कोटीहून अधिक लशी उपलब्ध होऊन लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

जून महिन्यात देशाला 12 कोटीहून अधिक लशी उपलब्ध होऊन लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

    नवी दिल्ली 31 मे : कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढ्यात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार आहे. तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत (Recovered Corona Patients) वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट (Death Rate of Corona Patients) होण्याची अपेक्षा आहे. इतकंच नाही तर जून महिन्यात देशाला 12 कोटीहून अधिक लशी उपलब्ध होऊन लसीकरणाचा (Corona Vaccination) वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे. जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. या डोसमधील जवळपास 6.09 कोटी डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील. तर, 5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात मागील तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ९ मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, ३० मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांचा असा दावा आहे, की जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशभरात कोरोनाचे दररोज 20 हजार नवे रुग्ण आढळतील. तर, जुलै महिन्यापर्यंत दुसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरेल. VIDEO:लहान मुलांना इतकं काम असतं का?ऑनलाईन क्लासबद्दल चिमुकलीची थेट PMकडे तक्रार आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील एका आठवड्यापासून 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली जात आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 21.14 लाखाच्या आसपास आहे. ही संख्या ९ मेच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत 35 टक्के कमी आहे. यावेळी भारतात 37.36 लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते. मे महिन्याच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांमध्ये भारतात 83135 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. हा आकडा एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत 92 टक्के अधिक होता. या काळात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 43258 होती. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या संख्येनं आयसीयूमध्ये भर्ती होणं, हेच मृतांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण आहे. मात्र, आता मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यासोबत मृतांच्या आकड्यातही काही प्रमाणात घट येऊ शकते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus cases

    पुढील बातम्या