• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • काही मिनिटं उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, पुण्यातील प्रकार

काही मिनिटं उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, पुण्यातील प्रकार

परीक्षेला येण्यासाठी काही मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरातील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे.

  • Share this:
पिंपरी-चिंचवड,26 फेब्रुवारी: परीक्षेला येण्यासाठी काही मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरातील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या छायाचित्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना शाळा व्यवस्थापकांकडून धक्काबुकी आणि अर्वाच्च शिवीगाळ झाल्याचाही प्रकार झाला. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नराधमांची खैर नाही.. अधिवेशन संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात 'दिशा कायदा' CBSC पॅटर्नच्या 10 वीच्या विद्यार्थ्याचा आज पेपर होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता पोहोचायचे होते. मात्र तीन विद्यार्थिनी नियोजित वेळेपेक्षा काही मिनिटं उशिरा पोचल्या. तेव्हा त्यांना पेपर देण्यास मज्जाव करण्यात आला. विद्यार्थ्यानी ही बाब आपल्या पालकांना कळवली. तेव्हा परीक्षा केंद्रापासून विद्यार्थी लांब राहतात. ते ठिकाण 15 ते 20 किलोमीटर असल्याने परीक्षा केंद्र दूर पडत असल्याने येताना अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे थोडा उशीर झाल्याच मान्य करत विद्यार्थ्यांच वर्ष वाया जाऊ नये, म्हणून विनंती पूर्वक परीक्षेला बसण्याची मागणी केली. 'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका मात्र केंद्रप्रमुखांनी ती मागणी फेटाळली आणि पालकांनाही बाहेर काढलं, ही बाब माध्यम प्रतिनिधींना कळताच त्यांनी तिथे धाव घेतली नेमका प्रकार काय घडला या बाबत पालक आणि विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी चायचित्रण करत असताना शाळेच्या आवारात चित्रण करू नका, हे सांगण्यासाठी आलेल्या शाळेतील एका कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या छायाचित्रकारावर झडप घेऊन त्यांना धक्काबुक्की केली. इतर प्रतिनिधींना अर्वाच्च भाषा वापरून शाळेबाहेर काढले. एकूणच हा प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वारंवार सांगूनही घडल्या प्रकाराबाबत शाळा प्रशासनकडून कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. शाळा प्रशासनाच्या अशा मुजोरीचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: