तुमची झोप पूर्ण झाली, अभ्यास करायची किंवा काही वाचनाची इच्छा असली तरी तुम्हाला त्यादरम्यान झोप लागते. किमान डुलकी तरी येते.
2/ 6
हे तुमच्यासोबतच नाही तर अनेकांसोबत होतं. याचा अर्थ अभ्यास किंवा वाचनाचा कंटाळा आला आहे किंवा आळस आहे असं बिलकुल नाही.
3/ 6
जेव्हा आपण अभ्यास किंवा वाचन करतो तेव्हा आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. मेंदू कॉम्प्युटर मेमरीसारखा डेटा फीड रत असतो. अशात डोळ्यांचा मांसपेशी शिथील पडतात. आपला मेंदूही थोड्या वेळाने मेहनत करण्यास नकार देतो आणि झोप येते.
4/ 6
म्हणून वाचताना झोप येऊ नये, यासाठी चांगला प्रकाश असणं गरजेचं आहे. यासाठी अशी जागा निवडा जिथं बाहेरील हवा आणि प्रकाश येईल. जेणेकरून शरीर ताजंतवानं राहिल.
5/ 6
आणखी एक कारण म्हणजे यावेळी आपलं शरीर रिलॅक्स होतं.म्हणजे फक्त मेंदू आणि डोळेच काम करत असतात. जेव्हा आपल्या शरीराला आराम मिळतो तेव्हा ते झोपेच्या मुद्रेत जातं. शरीर रिलॅक्स असल्याने मांसपेशी शिथील होऊ लागतात आणि झोप येते.
6/ 6
म्हणून अभ्यासासाठी एका विशिष्ट मुद्रेत बसायला सांगितलं जातं. बेडऐवजी टेबल-खुर्चीवर बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमचा मेंदूही यासाठी तयार राहतो आणि आळस येत नाही.