बाहेर कुठेही तुम्ही गेलात तरी भारतीय टॉयलेट सीट कमी आणि वेस्टर्न टॉयलेट्स जास्त दिसतील. पण असं का? कोणतं टॉयलेट आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
एका संशोधनात आढळून आले की एखादी व्यक्ती भारतीय शौचालय वापरते तेव्हा तिच्या शरीरात जास्त हालचाल होते. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो.
तर वेस्टर्न टॉयलेटचे आसन आरामदायी असते, पण ते वापरताना संपूर्ण त्वचेचा संपर्क येते जे धोकादायक आहे.
शिवाय स्टडीमध्ये असे समोर आले आहे की, भारतीय टॉयलेटच्या आसनामुळे पोट साफ करण्यासाठी कमी वेळ म्हणजे 3 ते 4 मिनिटे लागतात, तर वेस्टर्न आसनासाठी 5 ते 7 मिनिटे लागतात.
यामुळे अनेक वेळा लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही. असे घडते कारण भारतीय शौचालय वापरल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे पोट लवकर साफ होते.
गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी कोणते शौचालय चांगले आहे? भारतीय प्रटॉयलेट गरोदरपणात महिलांसाठी उत्तम आहे. कारण त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय भारतीय टॉयलेट वापरल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.