तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल पण कधी विचार केलाय. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फलकावर स्टेशनच्या नावानंतर त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची खाली का लिहिली जाते? रेल्वे स्थानकाच्या फलकावर स्थानकाची समुद्रसपाटीपासून उंचीची माहिती देऊन त्याचा उपयोग काय, याचा विचार केला आहे का? ही माहिती प्रवाशांसाठी खरोखर आवश्यक आहे.
Mean Sea Level म्हणजे काय? प्रत्येक रेल्वे स्थानकावर, फलाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एक मोठा पिवळा बोर्ड असतो, ज्यावर स्थानकाचे नाव आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवासी ते वाचतो. पण त्याचा वापर त्यांना माहित नसतो. जगभरात समुद्राची समान पातळी आहे, त्यामुळे समुद्रसपाटी हा उंची मोजण्यासाठी आधार मानला जातो, इंग्रजीत याला मीन सी लेव्हल म्हणतात.