हिना रब्बानी खार आणि बिलावल भुट्टो यांच्यातील प्रेमसंबंध पहिल्यांदा 2012 मध्ये उघड झाले होते. जेव्हा बिलावल भुट्टो फक्त 24 वर्षांचे होते आणि हिना रब्बानी खारचं वय 35 होतं. ‘द वीकली ब्लिट्झ’ या बांगलादेशी टॅब्लॉइडने सर्वप्रथम बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्यातील अफेअर आणि रोमान्सबद्दलचं वृत्त प्रकाशित केलं होतं, त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
आता हिना रब्बानी खार यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सदस्य, हिना रब्बानी खार या एक प्रसिद्ध राजकारणी आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2011 ते मार्च 2013 पर्यंत पाकिस्तानच्या 21 व्या परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलं आहे. हिना रब्बानी खार त्यांच्या राजकीय योग्यतेव्यतिरिक्त, उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात.
बांग्लादेशी वृत्तपत्राने 2012 मध्ये दावा केला होता की, बिलावल भुट्टो हे हिना रब्बानी खार यांच्या प्रेमात बुडालेले आहेत, ज्या त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या आहेत आणि विवाहित आहेत. हिना रब्बानी खार यांचं लग्न पाकिस्तानातील मोठे उद्योगपती फिरोज गुलजार यांच्याशी झालं होतं आणि त्यांना अनन्या आणि दिना नावाच्या दोन मुली आहेत.
बांगलादेशी वृत्तपत्रानं असा दावा केला होता की, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी हिना रब्बानी खार आणि त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानी राष्ट्रपती भवनात आपत्तीजनक स्थितीत पकडलं होतं. त्यावेळी बिलावल भुट्टो राष्ट्रपती भवनात राहत होते. आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्यानंतर राष्ट्रपती भवनात गदारोळ झाला. मात्र, ही बाब अत्यंत सावधगिरीने दाबण्यात आली.
पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमधील लोकांनी बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्यातील संबंधांबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्यावेळी हिना रब्बानी या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि वाद वाढल्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र, हिना रब्बानीला भारतातून खूप मोठा पाठिंबा देण्यात आला आणि 2012 मध्ये हिना रब्बानीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ट्रेंड चालवले गेले आणि हिना रब्बानींनी बिलावलशी लग्न करावं, असं म्हटलं गेलं.