Earthquake in Northern Peru: पेरु देशात झालेल्या भूकंपानं मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपात काही पुरातन इमारती कोसळल्या आहेत. त्याखाली सापडून तीन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. अमेझॉन आणि कजामार्का यांच्यादरम्यान असणाऱ्या रस्त्याला ठिकठिकाणी तडे पडले असून यामुळे वाहतूक ठप्प झाल आहे.
पेरू देशाच्या उत्तरेत 7.5 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षण विभागानं याची माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी पाच वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे अनेक घरांना तडे गेले असून रस्त्यांनाही ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.
2/ 5
भूकंपाच तीव्रता अधिक होती. मात्र भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली तब्बल 112 किलोमीटर असल्यामुळे कमी नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू बेरंका शहरापासून 42 किलोमीटवर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
3/ 5
अमेझॉन प्रांतातील पुरातन चर्चचा काही भाग कोसळल्याचं महापौर वाल्टर कलकुई यांनी म्हटलं आहे.
4/ 5
पेरुतील अमेझॉन आणि कजामार्का प्रांतातील काही इमारतींचे भाग कोसळल्यामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. राजधानी लीमामध्येदेखील भूकंपाचे धक्के जाणवले. काही लोक घाबरून आपापल्या घरातून बाहेर पडले.
5/ 5
भूकंप आल्यावर गुडघ्यांवर बसावं आणि हात खाली ठेवावेत, असा सल्ला सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशन यांनी दिला आहे. या अवस्थेत तुम्ही राहू शकू शकता आणि गरज पडेल तेव्हा पुढे सरकू शकता.