advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / निवडुंगही हवामान बदलामुळे होत आहेत प्रभावित, अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

निवडुंगही हवामान बदलामुळे होत आहेत प्रभावित, अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

निवडुंग किंवा कॅक्टसची (Cactus) रोपटी उष्ण परिस्थितीसाठी अधिक योग्य मानली जाऊ शकतात. परंतु, सध्याची बिघडलेली हवामानाची स्थिती आणि जागतिक तापमानवाढ (global warming) यामुळे निवडुंग देखील हवामान बदलाचे बळी ठरत आहेत. हवामान बदलामुळे (Climate Change)निवडुंगाच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याचा धोका असल्याचं नुकत्याच झालेल्या एका नवीन अभ्यासात आढळून आलं आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये निवडुंगाच्या प्रजातींचं अस्तित्व धोक्यात (Extinction Risk) असल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे.

01
निवडुंगाची वनस्पती कोरड्या वाळवंटात आढळते. ती अत्यंत उष्ण वातावरणातही आढळते. पृथ्वीवरील सर्वात कोरडं क्षेत्र असलेल्या अटाकामा वाळवंटातदेखील निवडुंगाची प्रजाती पाहायला मिळते. एकीकडे हवामान बदलामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर (Environment) परिणाम होत आहे. जागतिक तापमान वाढत आहे. यामुळे निवडुंग आणि त्याच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. याच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याचा धोका असल्याचं एका नवीन अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

02
निवडुंग ही जगातील बर्‍याच भागात सामान्यपणे आणि सहज उपलब्ध असलेली वनस्पती आहे, ती अत्यंत उष्णता आणि कमी पावसाच्या प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवू शकते. अशा स्थितीत वातावरणातील बदलामुळे संपूर्ण पृथ्वीचे तापमान वाढत असताना निवडुंगाला धोका नसावा, असा विचार होणं स्वाभाविक आहे. संशोधकांनी अलीकडेच 'Elevated Extinction Risk of Cacti Under Climate Change' या नवीन अभ्यासात याची चाचणी केली. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

03
त्यांच्या अभ्यासात, अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्रातील (Ecology and Evolutionary Biology) डॉक्टरेट विद्यार्थी, मायकेल पिलेट यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी, अतिशय गरम हवामानात (Extreme Heat) कॅक्टसवर काय परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. नेचर प्लांट्स या जर्नलमध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी निवडुंगाच्या 408 प्रजातींचा अभ्यास केला. हा आकडा कॅक्टसच्या ज्ञात प्रजातींच्या एक चतुर्थांश प्रजाती एवढा आहे (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

04
या अभ्यासात, संशोधकांनी सांगितलं की, त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष असं सूचित करतात की, कॅक्टस प्रजाती नष्ट होण्यामागे हवामानातील बदल हे एक प्रमुख कारण आहे. अभ्यासामध्ये समाविष्ट असलेल्या निवडुंग प्रजातींपैकी (Species of Cactus) 60 ते 90 टक्के प्रजातींना हवामान बदलामुळे किंवा मानववंशजन्य प्रक्रियांमुळे नुकसान होत आहे. या प्रक्रियांचा या प्रजातींवर कसा परिणाम होतो यावर ते अवलंबून आहे. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

05
हे आश्चर्यकारक वाटलं तरी निवडुंग आणि त्यांच्या प्रजाती केवळ वाळवंटातच वाढत नाहीत. या अभ्यासातून हेही अधोरेखित झालंय की, कॅक्टसच्या प्रजाती जमिनी आणि पर्वतांमध्ये कुठेही आढळतात. याशिवाय, हवामान बदलाच्या धोक्यामुळे, निवडुंग वनस्पतींच्या अनेक प्रजाती विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीनुसार स्वतःशी जुळवून घेत आहेत. यापैकी अनेक कॅक्टसमध्ये विशिष्ट परिसंस्था (Ecosystem) आणि जीवन इतिहास आहे. कॅक्टस अनेक उष्णकटिबंधीय आर्द्र जंगलात आणि अगदी थंड हवामानातही वाढतात. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

06
फ्लोरिडा, मध्य मेक्सिको, ब्राझीलचं अटलांटिक जंगल आणि ब्राझिलियन कॅटिंगा यांच्या पूर्वेकडील भागात कॅक्टसचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे. त्याच वेळी, अ‌ॅरिझोनाचं प्रसिद्ध सॅगोरोस कॅक्टस नामशेष होण्याची शक्यता कमी आहे. धोक्यात असलेल्या कॅक्टस प्रजातींमध्ये अमेरिका, दक्षिण दक्षिण अमेरिका, कॅटिंगा, ब्राझीलच्या पश्चिमेकडील भाग, ब्राझीलच्या सेराडोकाचा उत्तरेकडील भाग आणि अँडीजचा पातळ पट्टा यांचा समावेश होतो. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

07
गेल्या दशकभरापासून निवडुंगावर काम करणाऱ्या डॉ. गोच यांना अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, जेव्हा ते पूर्वी पाहिलेल्या निवडुंगाच्या क्षेत्राला भेट देतात तेव्हा त्यांच्याकडे निवडुंगाची संख्या कमी आढळते. डॉ गोच या नवीन अभ्यासात सहभागी नव्हते. त्यांना या तज्ज्ञांनी सांगितलं की त्यांना निवडुंगाच्या नष्ट होण्याचं कोणतेही विशिष्ट किंवा स्थानिक कारण दिसले नाही. त्यामुळे ते असे मानतात की, याचं कारण हवामान बदल हे असू शकतं. तसंच, हे देखील एक सत्य आहे की, जो बदलानुसार स्वत:ला जुळवून घेऊ शकत नाही, तो स्वत:च संपतो. हवामान बदलाच्या संदर्भात, हे कॅक्टसलादेखील लागू होतं. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

  • FIRST PUBLISHED :
  • निवडुंगाची वनस्पती कोरड्या वाळवंटात आढळते. ती अत्यंत उष्ण वातावरणातही आढळते. पृथ्वीवरील सर्वात कोरडं क्षेत्र असलेल्या अटाकामा वाळवंटातदेखील निवडुंगाची प्रजाती पाहायला मिळते. एकीकडे हवामान बदलामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर (Environment) परिणाम होत आहे. जागतिक तापमान वाढत आहे. यामुळे निवडुंग आणि त्याच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. याच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याचा धोका असल्याचं एका नवीन अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

    MORE
    GALLERIES