मानवी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप उघड झाला आहे. या धोकादायक भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 9.5 इतकी होती, असं एका नव्या अभ्यासात आढळून आलं आहे. चिली विद्यापीठाचे प्रोफेसर डिएगो सालाझार यांनी यासंदर्भात एक संशोधन केलं आहे. नाझ्का आणि दक्षिण अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्समधील टक्कर हे या विनाशकारी भूकंपाचं कारण होतं. त्यामुळे 49 ते 66 फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आणि 8 हजार किलोमीटरपर्यंत सुनामी आली.
सुमारे 3,800 वर्षांपूर्वी चिलीला झालेल्या या विनाशकारी भूकंपामुळे 66 फूट उंच लाटा उसळल्या आणि चिलीच्या काटाकामा वाळवंटात आदळल्या, जे जगातील सर्वात कोरडे वाळवंट देखील आहे. हा अभ्यास पूर्ण होण्यास सुमारे 7 वर्षे लागली आणि प्राचीन काळी अशा आपत्तींचा या प्रदेशावर किती वेळा परिणाम झाला हे तपासण्यात आले.
आतापर्यंतचा पहिला भूकंप 1960 मध्ये वाल्दिव्हियामध्ये झाला होता. त्याची तीव्रता 9.4 ते 9.6 दरम्यान होती. दक्षिण चिलीमधील या भूकंपामुळे 6,000 लोकांचा मृत्यू झाला आणि प्रशांत महासागरात वारंवार त्सुनामी आली. असे भूकंप जेव्हा पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सपैकी काही प्लेट्स एक एकमेकांवर सरकतात तेव्हा होतात. (फोटो- AP)
पुरातत्वशास्त्रज्ञ डिएगो सालाझार म्हणाले की, या विनाशकारी भूकंपात मोठ्या प्रमाणात जीव गमावला असावा, अशी आमची खात्री आहे. अन्यथा, यामुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित होऊन इतर ठिकाणी स्थायिक झाले असावेत. वैज्ञानिक अंदाजानुसार, या भूकंपानंतर लोकांना सुमारे 1 हजार वर्षे समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावं लागलं. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)