आपल्यापैकी अनेकांना कॉम्प्युटर चालू करताच ते रिफ्रेश बटणवर पुन्हा पुन्हा क्लिक करायची सवय असते. त्यानंतरच आपण काम सुरु करतो. तसेच फाईल हँग होत असतानाही आपण रिफ्रेश ऑप्शनवर जातो.
रिफ्रेश करणाऱ्या बहुतेकांना असे वाटते की त्यामुळे कॉम्प्युटरची स्पीड वाढेल. पण, त्याचा स्पीडसोबत काहीही संबंध नाही. मग हा ऑप्शन का दिला जातो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
खरंतर डेस्कटॉप किंवा होम स्क्रीन हे देखील एक फोल्डर आहे. ते आपोआप रिफ्रेश होते. म्हणजेच फोल्डरमध्ये जे काही बदल केले आहेत ते दिसतात. परंतु, असे न झाल्यास रिफ्रेश ऑप्शन सिलेक्ट केला जातो.
डेस्कटॉपमध्ये रिफ्रेश ऑप्शन सिलेक्ट केला जातो. तेव्हा ते लेटेस्ट माहितीसह फोल्डरला डिस्प्ले करते. ते तुम्ही उदाहरणाद्वारे समजू शकता. जसे आपण डेस्कटॉपवरील काही फोल्डरचे नाव बदलले आहे. परंतु, तरीही फोल्डर अल्फाबेटच्या ऑर्डरमध्ये येत नसेल.
तर रिफ्रेशचा ऑप्शन निवडल्यावर, डेस्कटॉपवरील सर्व फोल्डर अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये सेट केले जातील. यासोबतच, जर कोणताही शॉर्टकट दिसत नसेल किंवा कोणताही सेट वॉलपेपर दिसत नसेल, तर तुम्ही रिफ्रेश ऑप्शन निवडू शकता.