IPL 2021 च्या 53 व्या सामन्यात दीपक चहरने आपल्या गर्लफ्रेंडला पव्हेलियनमध्ये सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. त्यानरून अजूनही सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत.
दीपक लवकरच लग्नाच्या बेडीत अजकणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. पण त्याच्या बहिणीनेच त्याच्या प्रपोज करण्याची खिल्ली उडवली आहे.
दीपकने आपली गर्लफ्रेंड जया भारद्वाजला गुडघ्यांवर बसून प्रपोज करत अंगठी घातली. मॅचच्या वेळी पॅव्हेलियनमध्येच हे उद्योग झाले.
मालतीने आपल्या भावाच्या या प्रपोजची तुलना ही धूम या चित्रपटातील धांदरट पात्र रंगवणाऱ्या उदय चोप्राशी केली आहे. कारण त्यात उदय चोप्रा हा सतत लग्न आणि मुलंबाळं होण्याचं स्वप्न बघत असतो. आता बहिणीनेच हे उदाहरण दिल्याने दीपक ट्रोल झाला आहे.
दीपक चहरची गर्लफ्रेंड जया भारद्वाज ही BIGG BOSS या रिअॅलिटी शो चा 5 वा सीझन गाजवणाऱ्या सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. आता दीपकने चाहत्यांसमोरच तिला प्रपोज केल्यापासून तिच्याबद्दल चर्चा सुरू आहे.
दीपक चहरची बहीण मालती सोशल मीडियावर हिट आहे. ती सध्या मॉडेलिंग आणि अभिनय शिकत आहे. ती नेहमी CSK च्या स्टाफबरोबर दिसत (फोटो साभार-Malti Chahar/Instagram)