समुद्रमंथनापासून शंकराच्या मस्तकावर चंद्र शोभतो. चंद्र हा शिवाचा अलंकार मानला जातो. भगवान भोलेनाथांची भक्ती अगदी साधी आहे. जो कोणी भक्त त्यांचे खऱ्या अंत:करणाने स्मरण करून त्यांची पूजा करतो, महादेव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. विशेषत: सोमवारचा उपवास करून नियमानुसार भगवान शंकराची पूजा केल्यानं त्या भक्तावर महादेवाची कृपा राहते, अशी पौराणिक मान्यता आहे. पूजेत शंकराचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक झाल्यावर भांग, धतुरा इत्यादी त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.(प्रतिमा: कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)