सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या यात्रेला 900 वर्षांहून अधिक परंपरा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली.
गड्डा यात्रा असंही या यात्रेचं नाव आहे. या यात्रेमध्ये सोलापुरातील सर्व धर्माचे आणि सर्व भाषािक नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी होतात.
या नंदीकोलाचे आकर्षण लहान मुलांना खूप असते. त्यामुळेच खास बच्चेकंपंनीसाठी नंदीकोल बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
बाराबंदीच्या वेशात सजलेला हा चिमुकला पहिल्याच दिवशी घरच्यांसोबत मोठ्या उत्साहानं यात्रेत सहभागी झाला होता.
नंदिध्वजाचे दर्शन घेऊन ,आपल्या चिमुकल्या नातवासाठी केलेला नवस फेडण्यासाठी आजीबाई देखील पहिल्या दिवशीच मिरणुकीत सहभागी झाल्या होत्या.
पवन नावाचा घोडा यात्रेत विविध प्रात्याक्षिक दाखवत होता. त्याच्या प्रात्याक्षिकानं सोलापूरकरांचं चांगलंच मनोरंजन केलं.