पौरााणिक मान्यतेनुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हा दिवस माघी गणेश जयंती म्हणून साजरी केला जातो.
माघी शुद्ध चतुर्थीला तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला तेवढेच महत्त्व आहे.
विदर्भातील अष्टविनायक पैकी प्रमुख असलेले नागपुरातील गणेश टेकडी मंदिर आज गणेश जयंती निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांची आरास करून मनमोहक रूपानं सजविण्यात आले आहे.
विशेषत: अकराशे किलो बुंदीचा लाडू तयार करण्यात आला असून लाडूचा महाप्रसाद बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे.
अष्टविनायक मित्र मंडळातर्फे अकराशे किलो बुंदीच्या लाडूचा महाप्रसाद बाप्पाच्या चरणी आपण करण्यात आला आहे.