Fact Check : 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा बदलून घेता येणार? पाहा RBI काय म्हणाले
RBI ने खरंच याबाबत काही पत्रक जारी केलं आहे का? केंद्र सरकारने याबाबत काही घोषणा केली आहे का? या व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य काय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत असतात. काहीवेळा आपण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्याची सत्यता पडताळून पाहात नाही. सध्या एक असाच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे.
2/ 10
RBI ने खरंच याबाबत काही पत्रक जारी केलं आहे का? केंद्र सरकारने याबाबत काही घोषणा केली आहे का? या व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य काय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3/ 10
RBI ने जुन्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे. मात्र हे फक्त परदेशातील लोकांनाच लागू असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील लोकांना याचा लाभ मिळणार नाही असा मेसेज व्हायरल होत आहे.
4/ 10
8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली. त्यानंतर 500 आणि हजार रुपयांचा नोटा वैध नाहीत असं सांगण्यात आलं. त्यानंतर नव्या 500 रुपयांच्या नोटा चलनात आल्या.
5/ 10
नोटबंदीनंतर काही कालावधीसाठी नोटा बदलून घेता येणार होत्या. त्या कालावधीमध्ये अनेकांनी या नोटा बदलूनही घेतल्या. मात्र अजूनही काही जणांकडे जुन्या नोटा आहेत. आता त्या बदलून मिळणार नाहीत.
6/ 10
आता आरबीआयने परदेशी लोकांना जुने रु. ५०० च्या नोटा, रु. 1000 च्या नोटा बदलून घेण्याची परवानगी दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने यावर प्रतिक्रिया दिली.
7/ 10
आरबीआयचे पत्र बनावट आणि जुनं आहे. त्यामुळे यावर कोणतीही विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
8/ 10
५०० च्या नोटा, रु. 1000 च्या नोटा बदलून देण्याची मुदत 2017 मध्येच संपली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुन्हा जुन्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही.
9/ 10
तुमच्याकडे असा मेसेज आला असेल तर सावधान, हा मेसेज बनावट आहे, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही अशा लिंकवर क्लिक केल्यास.. तुमचे बँक खाते रिकामे असू शकते. म्हणूनच अशा फसव्या वस्तूंबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
10/ 10
हे आरबीआयचे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे.. ते पूर्णपणे बनावट आहे. त्याचा आरबीआयशी काहीही संबंध नाही.