अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मंदिराच्या बांधकामाचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज अक्षय तृतीयाच्या दिवशी हे फोटो समोर आले आहे
राम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिराच्या कामासाठी कामगारांची संख्या वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या पायाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्वीट करून माहिती दिली की, 'राम भक्तांनी केलेल्याा संघर्षानंतर आता भगवान श्री रामाचं भव्य मंदिर तयार होत आहे'
राजस्थानमधील बंसी पहाडपूर येथील दगडं आणण्यात आली आहे. या दगडातून मंदिराचे नक्षी काम केले जाणार आहे. मंदिराच्या खांबावर देवी आणि देवतांचे फोटो असणार आहे.
मंदिराच्या गर्भाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून भगवान रामलला 5 वर्षांच्याा बालक स्वरुपात विराजमान होणार आहे.