इन्कम टॅक्स विभागाच्या जुन्या टॅक्स प्रणाली अंतर्गत, असे अनेक पर्याय दिले आहेत ज्यावर तुम्ही तुमचे वार्षिक उत्पन्न वाचवू शकता. येथे अशाच काही पर्यायांची माहिती दिली जातेय.
जुन्या टॅक्स व्यवस्थेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात असे 6 टॅक्स सेव्हिंग पर्याय आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही मोठ्या प्रमाणात पगाराची अमाउंट टॅक्समधून बचत करु शकता.
सर्व प्रथम, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची टॅक्स सेविंग करता येते. यासाठी तुम्ही पीपीएफ, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम, ELSS म्युच्युअल फंड आणि ईपीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.
आयकराच्या कलम 80CCD (1b) अंतर्गत, तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करून 50,000 रुपयांची वजावट मिळवू शकता. त्याच वेळी, आयकराच्या कलम 80CCD (2) अंतर्गत, कर्मचारी NPS खात्यात गुंतवणूक करताना पगाराच्या 10% कपातीचा दावा करू शकतात. बँक अकाउंट बंद पडलंय आणि त्यात पैसे अडकलेय? या ट्रिकने सहज काढता येईल अमाउंट
कलम 80D अंतर्गत, तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास तुम्ही 25 हजार रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकता आणि तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही 50 हजार रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकता. SBI कस्टमर्सला डेबिट कार्डवर मिळतात 'या' सेवा, तुम्हाला माहिती आहेत का?
तुम्हाला पगारातच एचआरए मिळाला असेल, तर तुम्ही एचआरए वगळता उर्वरित इन्कमवर टॅक्स कॅलकुलेटची माहिती देऊ शकता. टर्म प्लान खरेदी करण्याचा प्लान करताय? मग ही माहिती असायलाच हवी
तुम्ही होम लोन घेतले असल्यास, तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत होम लोनवर 2 लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स कपातीचा दावा करू शकता.