फ्यूल क्रेडिट कार्ड म्हणजे काय? : पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चात बचत करण्यासाठी बाजारात अनेक फ्यूल क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. ते तुम्हाला नियमित ग्राहक म्हणून विविध रिवॉर्ड आणि पॉइंट देतात. त्याच्या मदतीने, तुम्ही इंधन खर्चात बचत करु शकता. उन्हाळ्यात AC मुळे जास्त वीजबिल येतंय? या 5 ट्रिक येतील कामी
फायदे काय आहेत? : इंडियन ऑइल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर तुम्हाला रिवॉर्ड म्हणून 4 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल. त्याच वेळी, 200 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास, तुम्हाला 1% फ्यूल सरचार्जमध्ये सूट देखील मिळते. यासोबतच कार्ड पार्टनर रेस्टॉरंटमध्येही तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत सूट देतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल एचडीएफसी हे 10,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या लोकांना 500 रुपये वार्षिक शुल्कावर कार्ड देते. कार्ड तुम्हाला इंधन खर्चावर 5% रिटर्न देते. फ्युएल पॉइंट वापरून तुम्ही 50 लिटरपर्यंत मोफत इंधन मिळवू शकता. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो
असा फायदा घ्या : तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागत असेल. तसंच तुम्ही खूप जास्त प्रमाणात फ्यूल क्रेडिट कार्डचा वापर केला. तर या कार्डचा योग्य फायदा तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्हाला कार्डचे चांगले ग्राहक बनावे लागेल. तुम्ही एकच कार्ड अनेक वेळा वापरता तेव्हा, तुम्ही एकापेक्षा जास्त रिवॉर्ड कलेक्ट करू शकता.नवीन आधार कार्ड तयार करायचंय? असं करता येईल अप्लाय