सरकार दरवर्षी 1 फेब्रुवारीला सादर करत असलेला अर्थसंकल्प हाच देशाचा लेखाजोखा असतो. सरकारला वर्षभरात कुठून कमाई होईल आणि कुठे आणि किती खर्च होईल ही सर्व माहिती यामध्ये दिलेली असते. मात्र अनेकांना बजेटचे भाषण हे कंटाळवाणे वाटते. कारण त्यांना यामधील शब्दांचे अर्थ कळत नाही. आज आपण बजेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत.
Consolidated Fund : सरकार उधारी किंवा सरकारी कर्जावर मिळालेल्या व्याजातून जे काही कमावते, त्याला एकत्रित निधी (Consolidated Fund) म्हणतात आणि देशात सरकारकडून केला जाणार खर्च या निधीतून केला जातो. Contingency Fund याला आकस्मिक निधी असे म्हणतात. आपत्कालीन परिस्थितीत सरकार ज्या निधीतून पैसे काढून खर्च करते त्याला Contingency Fund म्हणतात.