SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. SBI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ज्या ग्राहकांकडे SBI चे CASHBACK SBI कार्ड आहे ते यापुढे विमानतळावरील डोमेस्टिक लाउंजचा वापर करू शकणार नाहीत.
बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, ऑनलाइन आणि ऑफलाइन खर्चासाठी कॅशबॅक एसबीआय कार्ड ग्राहकांना कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे कॅश बॅक स्टेटमेंट जोडले जाईल.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, आता ग्राहकाने कितीही खर्च केला तरी त्याला जास्तीत जास्त 5000 रुपये कॅशबॅक मिळेल. याशिवाय देशांतर्गत विमानतळांवर लाउंज सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.
SBI च्या मते, दागिने, शाळा आणि शिक्षण सेवा, यूटिलिटीज सेवा, विमा सेवा, कार्ड, गिफ्ट, नवीन आणि सोवेनर शॉप्स, फानेंशियल इंस्टिट्यूशन आणि रेल्वे सेवांवर कॅशबॅक उपलब्ध होणार नाही. या सेवांच्या नावांसह, बँकेने त्यांचे व्यापारी कोड देखील जारी केले आहेत.