पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधान किसान योजनेचा 13वा हप्ता जारी करून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होळीची भेट देणार आहेत. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी कर्नाटक दौऱ्यात एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना 13 वा हप्ता जारी करतील. पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याअंतर्गत सरकार 16,800 हजार कोटी रुपये थेट शेतकरी कुटुंबांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतील.
पीएम किसान योजनेंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना सरकारकडून प्रत्येकी दोन हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. तुम्हाला पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता मिळेल की नाही? आपण सहजपणे ऑनलाइन तपासू शकता.
यादीत असं चेक करा तुमचं नाव : सर्वप्रथम pmkisan.gov.in या PM किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. फार्मर्स कॉर्नरवरील बेनिफिशियरी लिस्ट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. शेवटी रिपोर्टवर क्लिक करा आणि लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर येईल. यासोबतच, पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी झाल्यानंतर, तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही हे तुम्ही वेबसाइट किंवा अॅपद्वारे ऑनलाइन चेक करु शकता. PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! आज खात्यावर जमा होणार पैसे, तुम्हाला मिळणार का लाभ?
पीएम किसान 13व्या हप्त्याचे स्टेट मोबाइलवर कसे चेक करावं : यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन पीएम किसान अॅप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर मागितलेली माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल.
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र नाही? : राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी संस्था, विद्यमान आणि निवृत्त सरकारी अधिकारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. आयकर भरणाऱ्या व्यक्ती त्यासाठी पात्र होऊ शकत नाहीत. मंत्री किंवा कोणत्याही घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती याचा फायदा घेऊ शकत नाही. 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणाऱ्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.