एलआयसी वेळोवेळी अशा योजना सुरू करत असते ज्यात लोकांना सुरक्षिततेसह चांगला परतावा मिळण्याची हमी असते. एलआयसी हे विश्वासार्ह नाव आहे आणि सुरक्षित परताव्याच्या बाबतीत प्रत्येक वेळी अव्वल ठरते. LIC ची अशीच एक योजना म्हणजे धन वर्षा. ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2023 आहे. ही सिंगल प्रीमियम सेविंग लाइफ इंश्योरेंस योजना आहे. याचा अर्थ विमाधारकाच्या मृत्यूवर, ही योजना त्याच्या नॉमिनी किंवा कुटुंबाला डेथ बेनिफिट म्हणून एकरकमी रक्कम देते. फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूक
खातेदार पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत जिवंत असेल, तर त्याला जमा केलेली रक्कम निश्चित रिटर्नसह परत केली जाते. या योजनेत 10 किंवा 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. 10 वर्षांची पॉलिसी निवडण्यासाठी ग्राहकाचे वय किमान 8 वर्षे असणे आवश्यक आहे. LIC Policy धारकांना मोठा धक्का! सरकारने बदलले 'हे' नियम
15 वर्षांच्या पॉलिसीसाठी किमान वय 3 वर्षे आहे. मॅच्योरिटीच्या वेळी ग्राहकाचे किमान वय 18 वर्षे असावे. या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला निवडण्यासाठी 2 पर्याय मिळतात.
पहिल्या पर्यायामध्ये, विमाधारकाला डेथ कव्हर म्हणून जमा केलेल्या एकरकमी प्रीमियमच्या 1.25 पट मिळेल. म्हणजेच, जर एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांचा प्रीमियम जमा केला तर त्याच्या कुटुंबाला डेथ कव्हर म्हणून 12.5 लाख रुपये मिळतील. याशिवाय, विमाधारकाच्या कुटुंबाला हमी अतिरिक्त बोनस देखील मिळेल.
दुसऱ्या पर्यायामध्ये ग्राहकांना 10 पट रिस्क कव्हर मिळते. येथे, पॉलिसी परिपक्व होण्यापूर्वी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 1 कोटी रुपये मिळतील. जर विमाधारक 15 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी करतो तो मॅच्युरिटी होईपर्यंत जिवंत राहिला तर त्याला 16 लाख रुपये मिळतील.
या फरकाचे कारण काय? : खरंतर, एकाच योजनेच्या जोखीम संरक्षणातील परताव्यात इतका मोठा फरक विमा खरेदीदाराच्या वयावर अवलंबून असतो. जर तुम्ही 10 पट परतावा असलेली पॉलिसी खरेदी करत असाल तर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये. जर तुम्ही दुसऱ्या पर्यायाअंतर्गत 15 वर्षांची पॉलिसी निवडत असाल, तर ती 5 वर्षे कमी होऊन 35 वर्षे केली जाईल.
60 वर्षांपर्यंतचे लोक 1.25 पट पर्याय निवडू शकतात. तुम्ही हा प्लॅन जवळच्या एलआयसी ऑफिसमधून किंवा एलआयसी इंडियाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करू शकता.