IRCTC ने प्रवाशांसाठी एक खास टूर पॅकेज आणलं आहे. दरवेळी प्रमाणे या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे.
IRCTC ने उदयपूरसाठी टूर पॅकेज आणलंय, ज्यामध्ये तुम्ही फक्त 6,000 रुपयांमध्ये तलावांच्या या शहराला भेट देऊ शकता. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
उदयपूरला जगभरातून पर्यटक येतात. इथले तलाव पाहतात. हे शहर राजस्थानमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. उदयपूर हे एक रोमँटिक पर्यटन स्थळ देखील मानले जाते. फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे आणि या महिन्यात तुम्ही IRCTC टूर पॅकेजद्वारे या शहराला भेट देऊ शकता.
हे टूर पॅकेज दर गुरुवारी दिल्लीतून सुरू होते. रोहिल्ला स्टेशनवरून ट्रेन उदयपूरला निघते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार IRCTC टूर पॅकेज निवडू शकता. IRCTC देतेय दुबई फिरण्याची संधी, कमी खर्चात मिळणार 'या' सुविधा
हे पॅकेज डिलक्स आणि लक्झरी कॅटेगिरीमधील आहे. टूर पॅकेजेस रु.5,425 पासून सुरू होतात. पॅकेजमध्ये 3 रात्री/4 दिवसांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी तुम्ही दिल्लीहून संध्याकाळी 7.30 वाजता प्रवास सुरू कराल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.50 वाजता उदयपूरला पोहोचाल. IRCTC Gujarat Tour : आयआरसीटीसीचं खास पॅकेज, स्वस्तात फिरुन या गुजरात
हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर, सहेलियों की बारी, सुखाडिया सर्कल, सिटी पॅलेस संग्रहालय आणि भारतीय लोक कला मंडळाला भेट द्याल. त्यानंतर इतर ठिकाणी भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इंश्योरेंसही मिळेल.