या IRCTC टूर पॅकेजमध्ये, तुमच्यासाठी दुबईला जाण्या-येण्याच्या फ्लाइटच्या तिकिटांसह तेथे राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या सर्व गोष्टींचा या पॅकेजमध्ये समावेश आहे. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक दुबईला भेट देण्यासाठी जातात. तुम्हाला बुर्ज खलिफा पाहायचा असेल आणि डेझर्ट सफारीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या पॅकेजद्वारे बुकिंग करू शकता.
तुम्ही या टूर पॅकेज अंतर्गत 2 ते 3 लोकांसाठी बुकिंग केल्यास प्रत्येकी 85100 रुपये भाडे असेल. दुसरीकडे, जर तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी 101,800 रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये मुलांसाठी 84,400 रुपये भाडे ठरवण्यात आले आहे. तुम्ही हे पॅकेज आयआरसीटीसी कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुक करू शकता.