नेपाळ हे पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण आहे. नेपाळमध्ये निसर्ग सौंदर्याव्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळेही आहेत. जिथे लोक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे जाऊन तुम्ही अॅडव्हेंचर आणि निसर्गाचा भरपूर आनंद घेऊ शकता. तुम्हाला कमी बजेटमध्ये नेपाळचा दौरा करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
IRCTC भोपाळ ते नेपाळ या धार्मिक प्रवासासाठी अतिशय आलिशान आणि बजेटमध्ये बसेल असे टूर पॅकेज देत आहे. या हवाई टूर पॅकेजमध्ये तुम्हाला काठमांडू आणि पोखरा येथे जाण्याची संधी मिळेल. IRCTC Gujarat Tour : आयआरसीटीसीचं खास पॅकेज, स्वस्तात फिरुन या गुजरात
या पॅकेजला बेस्ट ऑफ नेपाळ एक्स दिल्ली असे नाव देण्यात आले आहे. पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होईल. 6 दिवस आणि 5 रात्रींचे हे टूर पॅकेज 30 मार्च 2023 पासून सुरू होईल. पॅकेजमध्ये तुम्हाला दिल्लीहून काठमांडूला फ्लाइटने नेले जाईल. यानंतर काठमांडू ते दिल्ली या विमानानेच परतीचा प्रवास होईल. मार्च महिन्यासाठी IRCTC चा जबरदस्त प्लान! 'या' शहरांची स्वस्तात करा सैर
कंफर्ट क्लासमध्ये ट्रिपल किंवा डबल ऑक्यूपेंसीवर प्रति व्यक्ती खर्च 31,000 रुपये आहे. तर सिंगल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती किंमत 40,000 रुपये आहे. 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह 30,000 रुपये आणि बेडशिवाय 24,000 रुपये शुल्क आकारले जाते.