Milk Price Hike : आजपासून मार्च महिना सुरू झालाय. या महिन्यात अनेक नवीन बदलही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र या महिन्यातील बदलामुळे तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे. कारण सर्वात आधी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ झाली. तर आज एटीएफच्या किमती कमी झाल्या आहेत. तसंच मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. कारण मुंबईकरांची खिशावर आता अतिरिक्त ताण पडणार आहे. कारण रोज लागणारे दूध हे महागलं आहे.
मंगळवार मध्यरात्रीपासून मुंबईतील म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 5 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कच्चा माल म्हणून त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण खाद्य उद्योगावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) गेल्या शुक्रवारी म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात मोठी वाढ जाहीर केली होती. एमएमपीएच्या कार्यकारी समितीचे सदस्य सीके सिंग म्हणाले- घाऊक दुधाच्या किमती 80 रुपये प्रति लिटरवरून 85 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढतील आणि 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील. यानंतर मुंबईतील 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून मलईदार ताज्या म्हशीच्या दुधाच्या किरकोळ बाजारात वाढ केली जाईल. जे आता 1 मार्चपासून प्रति लिटर 85 रुपयांवरुन सुमारे 90 रुपये प्रति लिटर मिळेल.
सर्वसामान्य ग्राहकांना या वाढीव दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. कारण दुधासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थ देखील महागतील. MMPA कोषाध्यक्ष अब्दुल जब्बार चावनीवाला म्हणाले- याचा परिणाम रेस्टॉरंट्स, फुटपाथ विक्रेते किंवा छोट्या हॉटेल्समध्ये दिल्या जाणाऱ्या चहा-कॉफी-मिल्कशेक इत्यादींच्या दरांवर देखील होईल.
आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर
खवा, पनीर, पेडा, बर्फी सारख्या मिठाई, काही उत्तर भारतीय किंवा बंगाली मिठाई यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत आता वाढ होऊ शकते. उत्तर मुंबईचे मुख्य दूध उत्पादक महेश तिवारी यांनी सांगितले की, काही सण आणि लग्नसराईच्या पूर्वसंध्येला ही दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम बुधवारपासून घाऊक दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे होणार आहे.
सप्टेंबर 2022 नंतर MMPA ची ही दुसरी मोठी वाढ आहे. जेव्हा म्हशीच्या दुधाच्या घाऊक किमती 75 रुपये प्रति लीटरवरून 80 रुपये प्रति लीटर करण्यात आल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरगुती बजेटवर ताण पडला होता. दुसरीकडे, फेब्रुवारी 2023 मध्ये, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गाय दूध उत्पादक संघ तसेच इतर मोठ्या ब्रँडेड उत्पादकांनी गायीच्या दुधाच्या दरात किमान 2 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Price hike