रेफ्रिजरेटरमध्ये प्रॉपर कूलिंग न होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दरवाजा नीट बंद न होणे. अनेकदा लोक रेफ्रिजरेटरचा दरवाजा बराच वेळ उघडा ठेवतात त्यामुळे कूलिंग कमी होते.
म्हणूनच नेहमी फ्रीझ व्यवस्थित बंद आहे की नाही ते तपासा जेणेकरून कूलिंग होऊ शकेल. फ्रीजचा दरवाजा नीट बंद होत नसेल तर तो बदलून घ्या.
इलेक्ट्रिशियनला कॉल करण्यापूर्वी, रेफ्रिजरेटरला मिळणारा पावर सप्लाय चेक करा. अनेकवेळा उंदीर घरातील फ्रीजची वायरिंग कापतात, त्यामुळे वीज पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे रेफ्रिजरेटर प्लग इन आहे की नाही किंवा चुकून स्वीच बंद तर नाही ना हे तपासा.
रेफ्रिजरेटर योग्य कूलिंग करत नाही याचं सामान्य कारण म्हणजे कूलंट कमी होणे म्हणजे कूलिंग गॅस संपणे. असं फ्रीज जुने किंवा लीक होत असल्यामुळे होऊ शकते. अशा वेळी चांगल्या कूलिंगसाठी कूलेंट टॉपअप करा.
फ्रीजचे टेम्परेचर ऋतूनुसार बदलते, त्यामुळे काही वेळा त्याचे तापमान व्यवस्थित सेट होत नाही. तुम्ही हिवाळ्यात तापमान सेट केले असेल तर उन्हाळ्यात ते पुरेसे थंड करणार नाही. त्यामुळे तापमान योग्य सेट करा.
कंडेन्सर कॉइलमुळे खराब झाल्यामुळे रेफ्रिजरेटर गरम होण्यास सुरवात होते. त्यामुळे कंडेन्सर कॉइल नियमितपणे सॉफ्ट ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लिनरने साफ करत रहा.