देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI देखील साधारणपणे 30 वर्षांसाठीच होम लोन ऑफर करते. अॅडऑनच्या रूपात अतिरिक्त सुविधेचा लाभ घेतल्यावर बँकेकडून जास्तीत जास्त 33 वर्षांच्या कालावधीसाठी लोन ऑफर केले जाऊ शकते.
बजाज हाऊसिंग फायनान्स सर्वात दीर्घ टेन्योरसाठी होम लोन देते. या फायनान्स कंपनीने कमाल 40 वर्षांच्या मुदतीसह होम लोन सादर केलेय. याआधी कंपनी फक्त 30 वर्षांचा टेन्योर देत होती. टेन्योर वाढवण्यासोबतच, कंपनीने सर्वात कमी EMI ऑफर केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, या कालावधीत ग्राहकाने प्रति 1 लाख रुपये 733 रुपये ईएमआय ऑफर केला आहे.
ICICI बँक जास्तीत जास्त 30 वर्षांचा होम लोन टेन्योर सादर करत आहे. म्हणजेच, या खाजगी क्षेत्रातील बँकेकडून होम लोन घेणाऱ्याला त्याची परतफेड करण्यासाठी 30 वर्षांची मुदत दिली जाईल.
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC ने देखील आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षांचा टेन्योर दिला आहे. बँक सध्या 8.50 टक्के सुरुवातीच्या व्याज दराने होम लोन देत आहे. येथून लोन घेणाऱ्याला प्रति 1 लाख रुपयांवर 769 रुपये ईएमआय भरावा लागेल.
PNB हाऊसिंग ही सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक बँक देखील 30 वर्षांची कमाल कार्यकाल ऑफर करते. या बँकेकडून कर्जदाराला त्याची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 30 वर्षांचा कालावधी दिला जातो.
बँक ऑफ बडोदा देखील आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षांची मुदत देते. टेन्योर जास्तीत जास्त 30 वर्षे ठेवण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकाला कर्जाची परतफेड करण्यासाठी इतकाच वेळ मिळतो. होम लोनसाठी या बँकेची किमान मुदत 5 वर्षे ठेवण्यात आली आहे.