RBI ने यावेळी MPC मध्ये रेपो रेट वाढवला नाही आणि तो फक्त 6.50 टक्के ठेवला. यापूर्वी मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहा वेळा वाढ केली होती. तेव्हापासून एफडीवरील रिटर्नमध्ये वाढ झाली आहे.
HDFC बँक 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या दरम्यान मॅच्योर झालेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 7 टक्के निश्चित करण्यात आलाय.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 1000 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या एफडीवर 9.01 टक्के व्याजदर मिळवू शकतात. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 8.41 टक्के ठरवण्यात आलाय.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 9.50 टक्के व्याजदर देतात. इतरांसाठी, त्याच कालावधीसाठी व्याज दर 9 टक्के आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 700 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याज देतेय. सामान्य नागरिकांसाठी याच कालावधीसाठी 8.25 टक्के व्याजदर आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 888 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याज देतेय. इतरांना याच कालावधीसाठी 8.5 टक्के व्याज मिळत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत कलश पेशल एफडी योजनेची वैधता 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये पेशल दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज दिले जातेय. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% टक्के व्याजदर आहे.