Boat Wave Leap स्मार्टवॉचमध्ये, कंपनीने 1.83-इंचाचा 2.D कर्व्ड HD डिस्प्ले दिलाय. ज्याची कमाल ब्राइटनेस 550 Nits ची आहे. हा डिस्प्ले 240X280 रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. यात स्मार्टफोनप्रमाणे ऑलवेज ऑन डिस्प्लेची सुविधाही आहे. ही स्मार्टवॉच अमेझॉनवर 1% डिस्काउंटवर विकले जातेय.
कंपनीने यामध्ये अॅडव्हान्स ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने उत्तम कॉल क्वालिटी उपलब्ध आहे. याला स्मार्टफोनशी सहज जोडता येते. स्मार्टवॉचवरून कॉलिंग आणि म्यूझिकसाठी वॉल्यूम कंट्रोल केलं जाऊ शकतं.
बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, याला 60 दिवसांचे स्टँडबाय बॅटरी लाइफ मिळते. त्याच वेळी, नॉर्मल यूजेसवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. ब्लूटूथ कॉलिंग वापरल्यास, तुम्हाला फक्त 3 दिवसांची बॅटरी मिळेल.
यामध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, स्लीप मॉनिटर, वेदर अपडेट आणि अनेक प्रकारचे अॅक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचच्या साहाय्याने कॅमेराही कंट्रोल केला जाऊ शकतो.
कंपनीने प्रीमियम मेटल डिझाइनमध्ये Boat Wave Leap स्मार्टवॉच सादर केले आहे. जे IP68 प्रोटेक्शनसह येते. तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला अॅक्टिव्ह ब्लॅक, डीप ब्लू आणि चेरी ब्लॉसम असे तीन रंग मिळतील.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Amazon वर त्याची MRP 7,990 रुपये आहे. तर 81% डिस्काउंट नंतर 1,499 रुपयांच्या किंमतीला विकली जात आहे. या स्मार्टवॉचवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल.