जर तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला अशा टॉप बँकांबद्दल सांगत आहोत ज्या त्यांच्या ग्राहकांना आरडी स्कीमवर 8% पर्यंत परतावा देत आहेत. जाणून घेऊया या बँकांबद्दल.
बंधन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD योजनेवर 4.50 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 8.00 टक्के व्याजदर देत आहे.
कॅनरा बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या RD वर 5.50% ते 7.00% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.00 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेस
पंजाब नॅशनल बँक आपल्या सामान्य ग्राहकांना RD योजनेवर 5.50% ते 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.00% ते 7.50% पर्यंत व्याजदर देत आहे.
येस बँक 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना 5.50% ते 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.00% ते 8.00% पर्यंत व्याजदर देत आहे. सोन्याच्या दागिन्यांवर मिळू शकतं 1 कोटी रुपये कर्ज, असं करा अप्लाय
स्टेट बँक आपल्या सामान्य नागरिकांना RD वर 6.25 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. 1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, अवश्य घ्या जाणून; अन्यथा अडकतील पैसे