डिजिटल अर्थव्यवस्था आणि बँकिंगचे बदलते स्वरूप यामुळे लोकांना फायदा झालाय. मात्र फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. लोक ऑनलाइन ट्रांझेक्शन जास्त करू लागल्याने फसवणुकीच्या पद्धतीही ऑनलाइन झाल्या आहेत. कधी कार्ड ब्लॉक करण्याच्या नावाखाली तर कधी लॉटरी जिंकण्याच्या नावाखाली सामान्य लोकांच्या कष्टाची कमाई गायब केली जाते. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीच्या अशा नवीन पद्धतीबाबत सावध केले आहे.
केवायसीच्या नावावर फसवणूक : सध्या ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी HDFC बँकेच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहे. तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर सावध राहायला हवं. फसवणुकीच्या या नव्या पद्धतीमध्ये एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना केवायसीच्या नावाखाली धमकावून त्यांची फसवणूक केली जातेय. हे लोक ग्राहकांना आधी सांगतात की, त्यांचे केवायसी समाप्त झालीये. नंतर केवायसी करण्याच्या नावावर लोकांचे बँक अकाउंट रिकामे करतात.
असे मेसेज ग्राहकांना येत आहेत : एचडीएफसी बँकेच्या अनेक ग्राहकांना यापूर्वी कथित केवायसी संदर्भात संदेश आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरून पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये ग्राहकांना सांगितले जात आहे की, त्यांचे केवायसी झाले नाही किंवा केवायसीची मुदत संपली आहे. लोकांना पाठवले जाणारे संदेश खालीलप्रमाणे आहेत, तुमच्या HDFC बँक खात्यासाठी KYC प्रलंबित आहे. या लिंकवर क्लिक करून ते अपडेट करा, अन्यथा तुमचे खाते ब्लॉक केले जाईल. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो
बँक अलर्ट : एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत सतर्क केलेय. बँकेने म्हटले की केवायसी किंवा पॅन अपडेट करण्याबाबत येणाऱ्या संशयास्पद मॅसेजवर लक्ष देऊ नका. त्यासोबत पाठवल्या जाणाऱ्या लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. Fuel Credit Card : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा देईल 'हे' क्रेडिट कार्ड, स्वस्तात मिळेल इंधन
बँकेकडून संदेश HDFCBK/HDFCBN या अधिकृत ID वरून पाठवले जातील आणि लिंक hdfcbk.io वरून सुरू होईल. नवीन आधार कार्ड तयार करायचंय? असं करता येईल अप्लाय