बजाज फायनान्सने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. कंपनीने FD व्याजदरात 35 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आता FD वर 8.20% पर्यंत व्याज मिळेल. FD वरील सर्व नवीन व्याजदर 4 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 44 महिन्यांच्या कालावधीसाठी 15,000 ते 5 कोटी रुपयांच्या FD वर जास्तीत जास्त 8.20 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 60 वर्षे वयाच्या व्यक्तींना त्याच कालावधीत वार्षिक 7.95 टक्के व्याज मिळेल.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नवीन रेट 12 महिने ते 60 महिन्यांच्या कालावधीच्या सर्व एफडीवर लागू होतील. हे व्याज मॅच्युरिटीच्या दिवशी, दरमहा, तिमाही, सहा महिने किंवा वार्षिक मिळण्याचा पर्याय ग्राहकाला आहे. तुम्ही किमान 15,000 रुपयांची FD उघडू शकता. तर ऑनलाइन एफडीची कमाल रक्कम पाच कोटी रुपये आहे. ऑफलाइनची कोणतीही कमाल रक्कम नाही. तुम्ही 12 ते 60 महिन्यांपर्यंतचा कार्यकाळ निवडू शकता.
बजाज फायनान्सच्या 12 ते 14 महिन्यांच्या एफडीवर पूर्वी 7.15 टक्के व्याज मिळत होते, ते आता 7.40 टक्के झालेय. त्याच वेळी, पूर्वी 15 महिन्यांच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज होते. ते आता 7.45 टक्के झालेय. यापूर्वी 15 ते 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.15 टक्के व्याजदर होता. तो वाढवून 7.50 टक्के करण्यात आलाय. 18 महिन्यांच्या एफडीमध्ये व्याजदर 7.15 वरून 7.40 टक्के करण्यात आलाय. 22 महिन्यांच्या मुदतीच्या FD साठी व्याजदर 7.45 टक्क्यांवरून 7.50 टक्के करण्यात आलाय. सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम
33 महिन्यांच्या मुदतीच्या FD वरील दर 7.70 टक्क्यांवरून 7.75 टक्के करण्यात आलाय. 36 महिने ते 60 महिन्यांच्या कालावधीच्या FD साठी व्याजदर 7.60 वरून 7.65 टक्के झाला आहे. 44 महिन्यांच्या एफडीचा व्याजदर 7.85 टक्क्यांवरून 7.95 टक्के झाला आहे. आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडा! LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन मिळेल मोठा फायदा