IDBI बँक - या बँकेकडून 6.75 टक्के व्याजदराने शिक्षणासाठी कर्ज मिळत आहे. 20 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षे मिळतील. म्हणजेच त्याची EMI 29,942 रुपये असेल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया - या बँकेचा व्याजदर 6.85 टक्के आहे. 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी, दरमहा 30,039 रुपये EMI भरावा लागेल.
बँक ऑफ इंडिया - SBI प्रमाणे, यावर देखील 7.25 टक्के व्याजदर आहे आणि परतफेड करताना 30,340 रुपये EMI भरावा लागेल.
इंडियन ओव्हरसीज बँक - येथील शैक्षणिक कर्जासाठी व्याज दर 7.25 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.
कॅनरा बँक - ही बँक वरील सर्वांपेक्षा जास्त म्हणजे 7.30 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्ही येथून कर्ज घेतलं तर, तुम्हाला दरमहा 30,480 रुपये EMI भरावा लागेल.