advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / PHOTO - MMRDA ने नटवली अशी 'मुंबई'; याआधी तुम्ही शहरात कधीच पाहिलं नसेल असं काही

PHOTO - MMRDA ने नटवली अशी 'मुंबई'; याआधी तुम्ही शहरात कधीच पाहिलं नसेल असं काही

महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था येथे विविध औषधी तसेच फुल झाडांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्राधिकरणाचे समग्र प्रदर्शनाचे पहिलेच वर्ष असून निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी MMRDA चा हा अभिनव उपक्रम आहे. पाहुयात फोटो.

01
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचालित महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे 3 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास भा. प्र.से. यांच्या हस्ते करण्यात आले.

02
उद्घाटन करून ते मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले. यंदा प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष आहे. यावर्षी हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी विनामूल्य असणार आहे.

03
याठिकाणी कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय तसेच कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात दिसणार आहेत.

04
कुंड्यामध्ये वाढलेल्या फळभाज्या पालेभाज्या व विदेशी वनस्पती, फळझाडे, हंगामी फुलझाडे, शोभिवंत पानाची झाडे, सुगंधी व औषधी वनस्पती, गुलाबाची रोपे यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

05
मुंबई बटुवृक्ष (बोन्साय) या प्रजातीच्या झाडांचे देखील समावेश असणार आहे. लहान मुलांसाठी आकर्षक असे फुलांनी सजवलेलं हत्ती आणि मोर असणार आहेत.

06
या प्रदर्शनात सनटेक, गोदरेज, हिरानंदानी, BARC, मुंबई रोझ सोसायटी, इंडियन बोन्साय सोसायटी, टाटा पॉवर, भारत डायमंड बोर्स, मुंबई महानगरपालिका, सोमय्या महाविद्यालय अशा संस्थांनी भाग घेतला आहे. प्रदर्शनासोबत आयोजित विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते उपलब्ध असणार आहेत.

07
या प्रदर्शनात हंगामी फुलझाडांच्या 45 प्रजाती, कुंड्यांमध्ये वाढलेल्या शोभिवंत विभागामध्ये 48 प्रजाती, कुंड्यांमध्ये वाढणाऱ्या फुलझाडांच्या 52 प्रजाती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या 50 प्रजाती, गुलाबाच्या 29 प्रजाती तर बोंसायच्या 30 प्रजाती असणार आहेत.

08
मुंबईच्या मीठी नदीच्या काठावर असलेल्या आणि पूर्वीच्या डम्पिंग ग्राउंड वर स्थित सुमारे ३७ एकर मध्ये पासरलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात, निसर्ग संवर्धनाबाबत महत्त्व समजावून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी एमएमआरडीएचा हा प्रयत्न आहे.

09
समग्र प्रदर्शनाचे हे पहिले वर्ष असून या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, भा. प्र.से. यांनी दिली.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचालित महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे 3 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास भा. प्र.से. यांच्या हस्ते करण्यात आले.

    MORE
    GALLERIES