काळा चहा आणि त्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होते. मात्र लिंबाचा उपयोग केवळ तितकाच नाही. आज आम्ही तुम्हाला लिंबाचे काही आगळे वेगळे उपयोग दाखवणार आहोत.
Femina मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबू वापरता येते. यासाठी लिंबू अर्धवट कापून फ्रीजमध्ये ठेवावे.
कपड्यांवरील डागांवर लिंबाचा रस पिळून त्यात चिमूटभर मीठ टाका. साबणाने किंवा डिटर्जंटने धुण्यापूर्वी हे काही तास राहू द्या. याने केचप, कॉफी आणि करी यांचे हट्टी डाग काढता येतात.
कापलेल्या सफरचंदाचे तुकडे लाल झाल्यास ते खावेसे वाटत नाही. यासाठी लिंबाचे काही थेंब पाण्यात पिळा आणि कापलेले सफरचंद त्यामध्ये बुडवा. याने तुमचे सफरचंद ताजे राहतील
केसातील कोंडा काढण्यासाठी तुमच्या टाळूला लिंबाचा रस लावा आणि अँटी-डँड्रफ शैम्पूने धुण्यापूर्वी 10 मिनिटे राहू द्या. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते जे कूपांच्या मुळांपासून कोंडाविरूद्ध लढण्यास मदत करते.
तुमच्या नखांची नेलपेंट पूर्णपणे निघाली नसेल तर एक कप कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात बोटे ५ मिनिटे भिजवा. नखं धुण्याआधी लिंबाची साल त्यावर चोळा. याने नेलपेंट पूर्णपणे निघून जाईल.
तुमचा मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी एका वाटली पाणी घेऊन त्यात लिंबू पिला आणि त्याची सालही पाण्यात टाकून मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. पाच मिनिटे मायक्रोवेव्ह सुरु करून त्यानंतर स्वच्छ करून घ्या.