आताच्या महिलांना ट्रेंडिंग पण साध असं मंगळसूत्र घालायला आवडतं. त्यात साउथच्या मंगळसूत्राचं तर अनेकांना आवड आहे. या मंगळ सुत्राला महत्व देखील खूप आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांनी आजच्या पिढीला जणू काही वेडच लागलं आहे. त्यामुळे लोक आता बॉलिवूड कमी आणि साउथ इंडस्ट्री आणि त्या सेलिब्रिटींना फॉलो करतात.
मग यामध्ये त्यांची कपड्यांची स्टाईल असोत, हेअर स्टाईल असोत किंवा मग डायलॉग. त्यात आता अनेक लोक लग्नात साउथ स्टाईल कपडे आणि मंगळसूत्र देखील फॉलो करतात.
शिवाय दररोजच्या वापरात देखील साउथ स्टाईल मंगळसूत्र खूपच मॉर्डन वाटतात. म्हणून महिला ते डिझाइन निवडतात.