advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही

India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही

Women freedom fighters of India: भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलं. अनेक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनमोल योगदान देणाऱ्या काही महिलांची माहिती आज आपण घेणार आहोत.

01
1.कमलादेवी चटोपाध्याय (Kamaladevi Chattopadhyay)- कमलादेवींचं भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान महत्त्वाचं आहे. सत्याग्रहामध्ये महिलांचा समावेश करावा अशी विनंती कमलादेवी यांनीच महात्मा गांधींना केली होती. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. 1942 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा झाल्या.

02
2. सरोजिनी नायडू (Sarojini Naidu)- सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यांनी समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध महिलांना जागरुक केलं आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत राहिल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आपला कैसर-ए-हिंद सन्मान परत केला होता.

03
3. भीकाजी कामा (Bhikaiji Cama)- भिकाजी कामा या परदेशात भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आजारपणामुळे 33 वर्षे भिकाजी भारतापासून दूर राहिल्या, पण दूर राहूनही त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न कायम राहिले. युरोपातील विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा देत राहिल्या. त्यांनी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली आणि त्यात वंदे मातरम् हे क्रांतिकारी मासिक काढले.

04
4. अॅनी बेझंट (Annie Besant)- अॅनी बेझंटचा जन्म लंडनमध्ये झाला असला तरी 1893 मध्ये भारतात आल्यानंतर त्या इथेच राहिल्या. 1917 मध्ये बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. न्यू इंडिया या वृत्तपत्राद्वारे त्यांनी ब्रिटीश सरकारकडे भारतात स्वराज्याची मागणी केली. बेझंट यांनी 1916 मध्ये भारतात होमरूल चळवळ सुरू केली.

05
5. अरुणा असफ अली (Aruna Asaf Ali)- अरुणा असफ अली यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवून त्यांनी तरुणांना प्रेरीत केलं. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. अरूणा असफ अली यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ‘ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणूनही ओळखले जाते.

  • FIRST PUBLISHED :
  • 1.कमलादेवी चटोपाध्याय (Kamaladevi Chattopadhyay)- कमलादेवींचं भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान महत्त्वाचं आहे. सत्याग्रहामध्ये महिलांचा समावेश करावा अशी विनंती कमलादेवी यांनीच महात्मा गांधींना केली होती. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. 1942 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा झाल्या.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement