सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? हे घरगुती ड्रिंक्स कायमचा घालवतील बद्धकोष्ठतेचा त्रास
बद्धकोष्ठता असल्यास व्यक्तीला दिवसभर खूप त्रासाचा सामना करावा लागतो. सकाळी पॉट साफ न झाल्यामुळे अस्वस्थता, डोकेदुखी असे त्रास होतात. आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्टता घालवण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत.
उघडे किंवा रस्त्याच्या कडेचे अन्न खाणे, बैठी जीवनशैली निवडी, औषधे किंवा पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मात्र जीवनशैलीतील साधे बदल आणि काही सोपे घरगुती उपाय करून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
2/ 7
शतकानुशतके बद्धकोष्ठता वेदना कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी घरगुती उपचारांचा वापर केला जात आहे. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी हे प्रभावी उपाय नक्की करून पाहा.
3/ 7
पोटासाठी जिऱ्याचे पाणीदेखील खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचे पाणी पचनक्रिया सुधारते, गॅस, पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम देते. त्याचबरोबर आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते.
4/ 7
बद्धकोष्टता घालवण्यासाठी सकाळी लिंबू पाण्यात मध मिसळून प्या. हे पाचनतंत्र मजबूतठेवताय, यामुळे पचनक्रिया सुधारते आणि सकाळी पॉट व्यवस्थित साफ होते.
5/ 7
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ओव्याचे पाणी बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय आहे. यामुळे गॅसेस, पोटदुखी, पोटातील जळजळ यावर खूप आराम मिळतो.
6/ 7
बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात कोरफडीचा रस समाविष्ट करावा. हेदेखील तुमचे पोट साफ करण्यात खूप प्रभावी आहे. मात्र हे सुरुवातीला कमी प्रमाणात घ्यावे आणि हळूहळू याचे प्रमाण वाढवणे योग्य.
7/ 7
पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचाही समावेश असावा. जसे की, गाजर, ओट्स, मटार, डाळी, बीन्स, सफरचंद, स्ट्रॉबेरी आणि ओट्स. हे पचन मजबूत करते ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.