काळी हळद प्रामुख्याने भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पिकवली जाते. ही हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्वचेसाठीही ही औषधापेक्षा कमी नसते.
काळी हळद ही पोटाच्या समस्यांवर अधिक गुणकारी आहे. काळ्या हळदीची पावडर पाण्यात मिसळून पिल्याने, ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. जर कोणाला पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर ही हळद खूप फायदेशीर ठरेल.
वाढत्या वयाबरोबर सांधेदुखीची समस्या जाणवू लागते. सांधेदुखीच्या वेदना वाढू लागल्यावर तर अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध काळ्या हळदीची पेस्ट प्रभावित भागात लावल्यास सूज कमी होऊन आराम मिळतो.
पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदही त्वचेसाठी फायदेशीर असते. हळद मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ग्लो येतो. याशिवाय चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.
किरकोळ जखम, त्वचा सोलवटणे यासाठी अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर केला जातो, पण जर तुम्हाला आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर दुखापती झालेल्या भागावर काळ्या हळदीची पेस्ट लावा. असे केल्याने जखमा लवकर बरी होते.