advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / एका लग्नाची गोष्ट! नवरदेव हेलिकॉप्टरने आला आणि एका रुपयासोबत नवरीला घेऊन गेला

एका लग्नाची गोष्ट! नवरदेव हेलिकॉप्टरने आला आणि एका रुपयासोबत नवरीला घेऊन गेला

लग्नाचा समारंभ सर्वांसाठीच आनंदाचा असतो. लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात. मात्र आम्ही ज्या लग्नाबाबद्दल सांगत आहोत ते थोडे अनोखे आणि प्रेरणादायी आहे. पाहा कशा पद्धतीने पार पडले हे लग्न.

01
रियांबडी तहसीलच्या बनवाडा गावात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या या लग्नाची सध्या परिसरात चर्चा आहे. गेल्या शुक्रवारी गावात समाजसेवक घनश्याम सिंह यांच्या भाचीचे लग्न होते. लग्नात नवरदेव हेलिकॉप्टरने आला आणि वधूला घेऊन गेला.

02
विशेष म्हणजे वधूला वडील नसून ते जेव्हा जीवनात होते तेव्हा त्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलीची विदाई हेलिकॉप्टरने व्हावी. ही गोष्ट नवरदेवाला समजताच त्याने आपल्या दिवंगत सासऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि लग्नासाठी बनवाडा गावात आले.

03
या लग्नाची विशेष गोष्ट म्हणजे हा विवाह हुंडा न घेता झाला. नवरदेवाने लग्नात हुंडा न घेता केवळ एक रुपया आणि नारळ शुभाशीर्वाद म्हणून घेतले. वधूच्या बाजूने पाच लाख रुपये हुंडा म्हणून नवरदेवाला देऊ केले गेले होते.

04
परंतु वराच्या नातेवाईकांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. वराचे वडील नंदसिंह राजावत यांनी सांगितले की, सध्याच्या काळात हुंडा ही एक वाईट पद्धत आहे. ही प्रथा संपवण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन आपली भूमिका बजावली पाहिजे.

05
अलवरमधील माधोगड येथून आलेल्या या लग्नाच्या मिरवणुकीची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. लोक नवरदेव रॉबिन सिंग राजावत आणि त्याच्या कुटुंबीयांचे कौतुक करत आहेत.

06
नवरदेव रॉबिन सिंग भारतीय सैन्यात कार्यरत आहे. हेलिकॉप्टर गावात आल्यावर गावकऱ्यांची गर्दी जमली आणि गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढले.

  • FIRST PUBLISHED :
  • रियांबडी तहसीलच्या बनवाडा गावात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या या लग्नाची सध्या परिसरात चर्चा आहे. गेल्या शुक्रवारी गावात समाजसेवक घनश्याम सिंह यांच्या भाचीचे लग्न होते. लग्नात नवरदेव हेलिकॉप्टरने आला आणि वधूला घेऊन गेला.

    MORE
    GALLERIES