वातावरण बदलंल तर सर्दी,खोकला होतोच. पण, जर खोकला बरेच दिवस राहीला तर मात्र त्रास होतो. बदलत्या हवामानात आणि पावसाळ्यात तर, कोरडा खोकला झल्याने बराच त्रास होतो.
2/ 9
कोरड्या खोकल्याने शरीर कमजोर होते, घसा छातीत दुखतं आणि इतरांनाही त्रास होतो. शक्यतो साध्या उपचाराने खोकला बरा होतो.पण, काहीवेळा बराच काळ त्रास रहतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, काही घरगुती उपाय करावेत
3/ 9
कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, पिंपळाच्या गाठीचा उपयोगी येईल. पिंपळाची गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून नियमित घ्यावी. यामुळे कोरड्या खोकल्यात आराम मिळेल.
4/ 9
कोरड्या खोकल्याच्या त्रासात मध आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मध अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यातील ऍन्टीऑक्सिडंट खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यात उपयुक्त आहेत. याशिवाय घशातील खवखव कमी करण्यातही मध उपयोगी ठरू शकतं.
5/ 9
कोरडा खोकला झाला असेल तर, दिवसातून दोनदा हर्बल टी किंवा लिंबू पाण्यात 2 चमचे मध मिसळून प्यावा.
6/ 9
कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकल्यात घशाला आराम मिळतो. याशिवाय मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ कमी होते. यासाठी, एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ मिसळा. दिवसातून बर्याच वेळा गुळण्या केल्या तरी चालेल.
7/ 9
आल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. याने खोकल्यातही आराम मिळतो. काळी मिरी आणि आल्याचा चहा पिल्याने खोकला बरा होतो.
8/ 9
खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.
9/ 9
घश्यातली जळजळ आणि वेदना दूर करण्यात पेपमिन्टची मदत होऊ शकते. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिन्टचा चहा प्या.